यवतमाळ येथून शिवसेना मेळाव्यास येत होते शिवसैनिक : मुंबईत दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सैनिकांच्या बसला इगतपुरीत भीषण अपघात८ ते १० जण गंभीर जखमी

पुणे दिनांक २४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा हा मुंबई येथील आझाद मैदानावर त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.या मेळाव्यास यवतमाळ येथील शिवसैनिक हे बसमधून येत असताना इगतपुरी येथे नवीन कसारा घाटात एका साइडला बंद पडलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात या बसमधील ८ ते १० शिवसैनिक हे जखमी झाले आहेत.बसचे ब्रेक फेल झाल्या मुळे बस ही छोटा हत्ती व ट्रकला जाऊन धडकली.
दरम्यान आज अनेक शिवसैनिक हे दसरा मेळावा साठी उपस्थित राहण्यासाठी येत असताना हा अपघात झाला आहे.त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. व त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी इगतपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Igatpuri News, यवतमाळ येथून शिवसेना मेळाव्यास येत होते शिवसैनिक News, Igatpuri Crime News, latest Igatpuri marathi news and Headlines based from Igatpuri City. Latest news belongs to Igatpuri crime news, Igatpuri politics news, Igatpuri business news, Igatpuri live news and more at Polkholnama.