९४ कोटींची रोकड,आठ कोटी रुपयांचे हिरे ३० किंमती घड्याळं एवढं घबाड लागले हाती : पाच राज्यात ५५ ठिकाणी छापेमारी करून व्यवसायिकांकडून ९४ कोटी रुपये इन्कम टॅक्स कडून जप्त

पुणे दिनांक १६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आयकर विभागाने आज कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली,व आंध्रप्रदेश ५५ ठिकाणी अचानक पणे छापेमारी करून यात रिअल इस्टेट.व इस्टेट डेव्हलपवर यांच्या निवासस्थानी व कार्यालया मधून ९४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन.सीबीडीटीच्या सूत्रांनी सांगितले की या टाकलेल्या धाडीत ९४ कोटी रुपयांची रोकड, ८ कोटी रुपयांची सोनं व हिऱ्यांचे दागिने व ३० किंमती घड्याळं असा मुद्देमाल जप्त केला आहे.यांची एकूण १०२ कोटी प्रर्यत आहे.याबाबत आरोपी यांची ओळख जाहीर करण्यात आली नाही.
दरम्यान या धाडी नंतर मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार घमासान सुरू झाले आहे.आयकर विभागाच्या या धाडीत कागदपत्रे व डिजिटल डेटा मिळाला आहे.या नंतर आयकर विभागाला कळाले की हे आरोपी फक्त कर चोरीच केली नाहीतर बनावट खरेदी द्वारे व्यवसायाचा खर्च हा वाढवून आपले उत्पादन कमी दाखवून हा घोटाळा केला आहे.यात मालाच्या पावत्या मध्ये भरपूर विसंगती आढळून आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.