Drugs seized : एअर इंडियाच्या पायलट कडून १२० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त NCB ची सर्वात मोठी कारवाई

मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी गुजरात राज्यातील जामनगर व मुंबई स्थित एका गोडवान मधून १२०. कोटी रुपयांचे एकूण.६०. किलो अमली पदार्थ मेफे ड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणात एअर इंडियाचा सेवानिवृत्त पायलट सह एकूण सहा जणांना गजाआड केल्याची माहिती एनसीबी चे उप महासंचालक एस के सिंह यांनी या कारवाई संदर्भात दिली आहे.
दरम्यान या कारवाईबाबत सिंह यांनी म्हणाले की हे एमडी ड्रग्ज मुंबई व जामनगर या ठिकाणी असलेल्या गोंडवान मधून जप्त केले आहे. सदरची कारवाई ही एका खबऱ्यामार्फत मिळाल्यानंतर या गोंडवानवर छापा टाकून एनसीबीने या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. व मुख्य सूत्रधारासह एकूण सहा जणांना गजर केले आहे. सर्वप्रथम जामनगरच्या नैदलाच्या इंटेलिजन्स च्या युनिटने एमडी ड्रग्जची विक्री व खरेदी ची माहिती दिली होती. त्यांच्या माहितीनुसारच एन सी बी व नेव्हल इंटेलिजन्स युनिट या दोन्ही विभागाच्या संयुक्तरीत्या कारवाई करून त्यांच्या खबरीनुसार गुजरात मधील जामनगर मधून.१० हजार ३५०. किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. त्याच कारवाईदरम्यान दोन तस्करा पैकी एक जण हा सोहेल महर गफिता हा सन २०१६ ते २०१८ च्या कालावधीत एअर इंडियाचा पायलट होता. याचा जामनगर व मुंबई मधील जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाई जप्त करण्यात आलेली एमडी ड्रग्सचे वजन हे ६०. किलो असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १२०. कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.