Crime : आर्थिक संकट पैशांची चण.चण यातून २७ वर्षीय बीड मधील शेतक-यांने संपवली जीवन यात्रा

पुणे दिनांक ३० (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आर्थिक संकट पैशांची चण चण यातून एका २७ वर्षीय तरूण शेतकय-यांने आपली जीवनयात्रा संपवल्यांची दुदैवी घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव या गावात घडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे नाव दत्ता अंबादास पाटोळे असे आहे.
या घटने बाबत सूत्रांनच्या द्वारे मिळालेली माहिती अशी की. तरूण शेतकरी दत्ता यांना फक्त दीड एकर शेती आहे. शेतीवरच त्याचे संपूर्ण कुंटूब अंवलबून होते मात्र निसर्गाच्या अस्मानी संकटांने ते मानसिक तणावात होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरात पत्राच्या शेड मध्ये आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटने नंतर या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. व संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील वडवणी पोलिस स्टेशन मध्ये मृत्यूची आकस्मित अशी नोंद करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.