छत्रपती संभाजीनगर मध्ये ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त.आता ..." महाराष्ट्राचा झाला उडता पंजाब " : पुणे, नाशिक, सोलापूर, आज संभाजीनगर मध्ये मोठी कारवाई तब्बल ५००कोटी रुपायांचे ड्रग्स जप्त

पुणे दिनांक २२ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे . नाशिक नंतर सोलापूर व आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचे ड्रग्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.यामुळे छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसात मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आले आहे . ड्रग्स माफिया ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालया मधून पोलिस व ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने पळून गेल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिक मध्ये जाऊन त्याची ड्रग्स ची फॅक्टरी उध्वस्त केली व पळून गेलेल्या ड्रग्स रॅकेटचा मुख्य माफिया याला अटक करुन त्याचा महाराष्ट्रातील सर्व नेटवर्कची मुंबई मधील साकीनाका पोलिसांनी पोलखोल केली आहे.दरम्यान ललित पाटील याला अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ड्रगचे साठे पोलिसांनी जप्त केले आहे.छत्रपती संभाजीनगर शहरांमधून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.मुंबई.पुणे.गुजरात . यांच्या जी एस टी . विभागाच्या टीमने संयुक्तरीत्या कारवाई केली आहे.कांचनवाडी येथे जितेश कुमार पटेल यांच्यासह एकावर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.तब्बल ५०० कोटिचे ४० किलो कोकेन जप्त केले आहे.छत्रपती संभाजीनगर मध्ये अहमदाबाद क्राइम ब्रॅच DRI च्या कारवाई नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.जर बाहेरील राज्यातून पोलिस येऊन मोठी कारवाई करत असतील तर छत्रपती संभाजीनगर मधील पोलिस काय झोपलेले होते का ? असा सवाल विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.एकंदरीत आता पंजाब नंतर महाराष्ट्र राज्याचा नक्कीच तशी गत होऊन आता.. उडता महाराष्ट्र ? म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.