बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात ५ जणांची प्रकृती चिंताजनक : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी बस रेल्वे ट्रॅकवर पडली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पुणे दिनांक ६नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सोमवारी पहाटे आज राजस्थानमधील दौसा जिल्हा येथे एक बसवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस पूला वरुन खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात बस मधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तर बस मधील ४० हून अधिक प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बस ही प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.मृतात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.सदरची बस ही खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर पडली आहे.त्यामुळे या मार्गावरील रेल्वे ट्रेनची वाहतूक व्यवस्था तातडीने थांबवण्यात आली आहे.
दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहिती नुसार प्रवाशांनी खचाखच भरलेली बस हरिद्वारवरुन जयपूरच्या दिशेने जात असताना बस दौसा येथील राष्ट्रीय महामार्गवर २१- वरील पुलाजवळ आली असताना बस वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस पूलाचा कठाडा तोडून पुलाच्या खाली कोसळली व भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.यात २५ ते ३० प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर यातील ५ प्रवासी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बचावकार्य सुरू आहे तर या महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे.हीबस पूलावरुन खाली असेलेल्या रेल्वे ट्रॅकवर पडली असल्याने रेल्वेची वाहतूक देखील थांबवलेली आहे.घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी देखील दाखल झाले आहेत.रेल्वेचे आप आणि डाऊन दोन्ही बाजूंच्या रेल्वे ट्रेन थांबवलेल्या आहेत.व मदत कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.