PFI : पुण्यात पी एफ आय चे बेकायदेशीर आंदोलन प्रकरणी एकूण ७० कार्यकर्तेंन विरोधीत गुन्हा दाखल

पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) संघटनेच्या कार्यकर्तेंना दहशतवादी विरोधी पथक व अंमलबजावणी संचालयाने अटक केली आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. बेकायदेशीर आंदोलन केले या आंदोलनाला कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन पोलिसांनी परवानगी नाकारली असतांना सुध्दा पी एफ आय च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण ७०. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार रिजाज जैनुद्दीन सय्यद ( वय.२६. रा.शिवनेरी नगर.कोंढवा खुर्द पुणे.) यांच्यासह एकूण ६०. ते ७० कार्यकर्तेंन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या वतीने पोलीस हवलदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून. त्यानंतर पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहे.
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत काही कार्यकर्त्यांनी म्हणजे चार जणांनी जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन द्या अशी सूचना बंद गार्डन पोलिसांनी पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) दिली होती. मात्र पोलिसांच्या या सूचनेला कार्यकर्त्यांनी हरताळ फासून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हळूहळू गर्दी केली तसेच मोबाईल वरून त्यांच्या अन्य लोकांना फोन करून सदर ठिकाणी बोलवले.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गर्दी केली तसेच बोलाई चौकात जमून रस्ता आणून वाहतूक कोंडी केली यावेळी जमावाकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली यावेळी एन आय येणे अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात घोषणा देण्यात आल्या. यावेळी अल्लाहू अकबर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या या घोषणाचा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. याबाबत पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून दिले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.