Extortion : डॉक्टरांना पाच लाख रूपये खंडणी मागणा-या महिला व पुरूष यांचे विरूध्द गुन्हा दाखल

पुण्यातील डॉक़्टर यांनी महिला व पुरूष हे गैरअर्जदार महिलेचा गावठी कुत्रा अर्जदार डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मेला असून त्याची भरपाई म्हणून पाच लाख रूपयांची मागणी करून बदनामीची धमकी देत असलेबाबतचा तक्रारी अर्ज वरिष्ठ कार्यालयात केला होता.
सदर तक्रारी अर्ज पुढील चौकशीकामी खंडणी विरोधी पथक-1, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे प्राप्त झाला होता. प्राप्त तक्रारी अर्जाची चौकशी करीत असताना सदरचे दोन्ही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना फोन करून पाच लाख रूपयांची मागणी करून मांडवली अंती चार लाख रूपये घेवून येण्यास सांगितले होते. प्राप्त माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने वर नमूद दोन्ही गैरअर्जदार यांचेवर जिल्हाधिकारी ऑफीस कॅन्टीन येथे सापळा कारवाई करून अर्जदार यांचेकडून रोख चार लाख रूपये स्वीकारले असताना रंगेहाथ पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपी महिला,पुरूष व एक अनोळखी इसम विरूध्द शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि,नं.144/2022 भा.दं.वि कलम 384,385,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हयाचा पुढील तपास विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक-1, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे,गुन्हे शाखा,पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त, श्री.श्रीनिवास घाडगे,गुन्हे शाखा पुणे शहर, मा.सहायक पोलीस आयुक्त-2, गुन्हे शाखा श्री.नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारे, सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोउनि विकास जाधव, म.पो.अमंलदार ढेबे, पो.अमंलदार भापकर,फुलपगारे,सयाजी चव्हाण,नितीन कांबळे,दुर्येाधन गुरव,विजय कांबळे,गंगावणे यांनी ही कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.