Crime : कावड यात्रांमध्ये तलवार फिरवली शिवसेना आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल

पुणे दिनांक २९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंगोली येथे झालेल्या उध्दव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढण्यात आली होती.या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमावण्यात आली होती त्यावेळी शक्ती पर्दशन करीत बांगर यांनी हातात तलवार घेऊन ती हवेत फिरवल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान रविवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी उध्दव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर काढली होती.सदरच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते यांची गर्दी जमली होती.कळमनुरी शहरातून निघालेल्या या यात्रेत शिवभक्ताने आमदार संतोष बांगर यांचं सत्कार करत त्यांना तलवार भेट दिली.यावेळी आमदार यांनी म्यानमधून तलवार काढून ती हवेत फिरवली व जमलेल्या कार्यकर्ते यांच्या समोरच शक्ती पर्दशन केले.याप्रकरणी त्यांच्या विरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बांगर यांनी पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावण्यात आला असे देखील पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.काल श्रावण सोमवार असल्यामुळे त्यांनी कावड यात्रा काढल्याची माहिती मिळाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.