Accused arrested : उत्कर्ष सोसायटी कात्रज राजगड व्हीला येथे तीस लाखाची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोंढवा बुद्रुक येथे राहणारे ५४ वर्षीय गृहस्थाला मुलीची छेड काढली असे चौघांनी मिळून संगनमत करून त्यांना राजगड व्हीला येथील पहिल्या मजल्यावर नेऊन मारहाण करुन ३० लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यांना चाकू व पिस्तूल चा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज असा एकूण १ लाख ९५ हजार ६०० रुपायांचा मुद्देमाल चोरुन नेल्या प्रकरणी पोलिसांनी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेबाबत भारती विद्यापीठ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. कोंढवा बुद्रुक येथे राहणारे 56 वर्षीय गुहस्थ यांना एक मुलगी व अन्य तिघा जणांनी संगणमत करून सदरच्या इसमांनी त्यांना लुटण्याच्या इराद्याने त्यांच्यावर मुलीची छेड काढण्याचा आरो प लावून तसेच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली व त्यांना कात्रज येथील उत्कर्ष सोसायटीतील राजगड विला येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोंडून चाकू व पिस्तूल सारख्या वस्तूचा धाक दाखवून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याची अंगठी व चांदीची अंगठी व रोख रक्कम ५ हजार १०० रुपये असा एकूण १ लाख ९५ हजार ६०० रुपायांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी सदर ५४ वर्षीय गुहस्थ यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर. पोलिसांनी एक मुलगी व तिचे अन्य तीन साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.