Molesting : दौंड मध्ये फॉरेस्ट रोडवर मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर दोघांवर गुन्हा दाखल

दौंड मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी ती तिच्या भावासह खाजगी हॉस्पिटलमध्ये आईला भेटून आपल्या भावासह अन्य नातलकांसमवेत सात नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना दोघाजणांनी मिळून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या भावाला जबरदस्त मारहाण केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करून घेतली नाही. सदर मुलींनी पोलीस अधीक्षकांना भेटून आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दोघाजणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली माहिती अशी की. कुमारी अमृता राम महामुनी.( वय,१९. रा. मीरा रो हाऊसिंग सोसायटी दौंड.) ही युवती दौंड येथील दौंड तालुका कला वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिची आई फॉरेस्ट रोड वरील मदने हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल आहे. तिच्या आईला भेटून भावासमहेत व अन्य तिघा नातलगांन समावेत फॉरेस्ट रोड ने जात असताना आफ्रिदीन शेख. व त्याचा साथीदार यांनी अमृताला व अन्य लोकांना शिवीगाळ केली व सरळ मुलीच्या अंगावर येऊन खांद्याला व कमरेला स्पर्श करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी मुलीसोबत असणाऱ्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी मिळून अमृता तिचा भाऊ ओम राम महामुनी व प्रथमेश कदम व विठ्ठल कुलकर्णी यांना देखील मारहाण केली. व मुलीला धरून ढकलून दिले.
दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी सदरची भांडण सोडवली. सदरच्या घटने प्रकरणी अमृता महामुनी यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता. राजकीय दबावा पोटी पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. त्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पोलीस अधीक्षक गोयल यांनी आदेश दिल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करून मारहाण व विनयभंग प्रकरणी वरील दोघांना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंड शहरात सद्यस्थितीत कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. पुणे माणसांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतली जात नाही. त्यांना आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी दौंड वरून तब्बल 100 किलोमीटर लांब येऊन ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाद मागण्यासाठी जावे लागणे हे एक मोठे दुर्दव्य आहे.
दौंड शहरात मटका हा संपूर्ण चौका चौकात दिवसाढवळ्या टपऱ्या टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच दारू देखील चौका चौकात मिळत आहे. त्याचप्रमाणे गांजा देखील सगळीकडे मिळत आहे. सावकारी मोठ्या प्रमाणात सर्वत्र चालू आहे तसेच वाळू चोरी देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. एकंदरीतच अवैध धंदे सर्वत्र चालू असून त्यामुळे दौंड शहरात सर्वत्र गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात चालू आहे.व अवैध धंद्या मुळे. गुन्हेगारी मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे व दौंड मधील पोलीस उपविभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी धस यांचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत काय तर कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शहरात राहिली नाही. प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये या धंद्यामुळे भीती निर्माण झाली आहे. राजकीय आकासा पोटी गुन्हा दाखल करून न घेणे व सामान्य माणसाला न्याय न देणे. एखांदी व्यक्ती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आल्यास. ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे. त्या माणसाला आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होतोय याची माहिती आधीच दिली जाते. सदरचा व्यक्ती राजकीय दबाव टाकून समोरच्या व्यक्तीला धमकावून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना पोलीस स्टेशन मधून बाहेर काढले जाते. या सर्व गोष्टी सरासपणे बघायला मिळत आहे. ज्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतली जात नाही. त्या व्यक्तीला आपल्या न्याय हक्कासाठी तब्बल 100 किलोमीटर दौंड वरून पुणे येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात पाषाण येथे जावे लागत आहे. यासारख्या घटना घडणे म्हणजे दौंड येथे पोलीस उपविभागीय कार्यालय असून "असून ओंळबा व नसून खोळंबा" असेच म्हणावं लागेल. या घटनेत देखील पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच सूत्र हालल्या नंतर जर गुन्हा दाखल होत असेल तर दौंड मधील सर्व या यंत्रणा नेमक्या काय करतात हे एक प्रश्नचिन्ह "?" आहे. आता नव्यानेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचे सूत्र पोलीस अधीक्षक . गोयल सर यांनी घेतले असून. ते आता संपूर्ण जिल्ह्यातच ढिसाळ झालेली पोलीस यंत्रणा नव्याने पुन्हा एकदा चांगल्या ट्रॅकवर आणतील यात मात्र आता शंका नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.