नाशिक लाचलुचपत विभागाची अहमदनगर मध्ये मोठी कारवाई : अहमदनगर मध्ये तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

पुणे दिनांक ४नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अहमदनगर येथे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करुन एक कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील दोंघाजणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.यात सहाय्यक अभियंता अमित गायकवाड व धुळे येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांचा समावेश आहे.नगर येथील एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये दोंघाजणांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. अहमदनगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक मधील पथकाने एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे.व नंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तत्कालीन सहायक अभियंता व धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांची माहिती समोर आली.या दोंघा विरुद्ध आज पहाटे अहमदनगर येथील एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.