Crime : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी कराड मध्ये गुन्हा दाखल

पुणे दिनांक ३०जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून या मुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन आणि इमेल आला यात त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस स्टेशन मध्ये फोन करण्या-यां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थाना समोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एका मराठी वृत्त वाहिन्यांनी या बाबत वृत्त दिले आहे. ' गांधी 'यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची संभाजी भिडें वर टीका .व अटकेची मागणी केली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.