शासकीय कामात अडथळा मुंबई महापालिका कडून तक्रार दाखल : डिलाईल रोड ब्रिजच्या लेनच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे पदाधिकारी यांच्यासह एन एम जोशी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

पुणे दिनांक १८नोव्होंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम)परेल येथील उड्डाणपूलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन युवासेनेचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एन एम जोशी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबई महानगरपालिकेच्या बी एम सी प्रशासनाकडून परेल रोडवरील डिलाईल रोडचे उड्डाण पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणी मुंबई मधील एन एम जोशी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा व या पुलाची अजून टेस्ट न घेता उद्घाटन केल्या मुळे ते धोकादायक आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या बाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या ब्रीजचे सर्व काम करुन सात दिवसानंतर ही लेन सुरू केली जाणार होती.दरम्यान असे असताना आदित्य ठाकरे यांनी अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर आहे.असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान याप्रकरणी युवा सेनाचे नेते आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी या पुलाच्या एका लेनचे उद्घाटन केले होते.दरम्यान याबाबत बोलताना आधी पुलांचे काम रखडले होते.व आता पुलाचे उद्घाटन थांबविले होते.पालकमंत्र्यांन वेळ नाही.म्हणून मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे.याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.त्यासाठी नागरिकांन साठी उद्घाटन केले.असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.