अधिष्ठाता व बालरोगतज्ज्ञ यांचे उपचारात जाणीवपूर्वक दुर्लक्ष : नांदेड मधील चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीव मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अधिष्ठातावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे दिनांक ५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नांदेड मधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका लहान बालकासह त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाला आहे.आता याप्रकरणी आता मृत्यू झालेल्या महिल्याच्या नातेवाईकांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णांलयाचे अधिष्ठाता व बालरोगतज्ज्ञ डॉक्टर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता एस.आर.वाकोडे व बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आपल्या फिर्याद मध्ये म्हणाले आहे.तसेच यावेळी रुग्णांवर उपचार करण्या पेक्षा येथील डॉक्टर रुग्णालयात एका डाॅक्टराच्या वाढदिवस साजरा करत होते.असे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे.दरम्यान येथे रुग्णालयात मृत्यू झाल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.व या घटने बाबत आज तातडीने सुनावणी होणार आहे.व राज्य सरकारचे महाधिवक्ता बीरेद्र सराफ यांना या प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्या बाबत निर्देश देण्यात आले आहे.आता या सुनावणी कडे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.