Crime : मुंबई ते बंगळुरू महामार्गावर नवले पूला जवळ कोळसाचा कंटेनर उलटला

पुणे दिनांक १० ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई ते बंगळुरू महामार्गावर आज सकाळी कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली असून हा कंटेनर नवले पूला जवळ पलटी झाला असून. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. सदरच्या अपघातात कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारा करिता जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदरच्या अपघातात बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कंटेनर सातारा येथून कोळसा घेऊन मुंबई कडे चालला होता. व नवले पूला जवळ पलटी झाला. सकाळी या रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते पण सुदैवाने या मध्ये कोणतेही मोठी दुर्घटना झाली नाही. अपघाता नंतर या रोडवर प्रचंड प्रमाणात मोठी वाहतूक व्यवस्था कोलमडली वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या पंरतु वाहतूक पोलीसांनी सदरची वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.