सरकारने इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे उद्रेक होवू शकतो.एक हजार आंदोलनकर्ते अंतरवली सराटीत दाखल : दगाफटका करण्याचा सरकारमधील एका उपमुख्यमंत्र्यांचा डाव असू शकतो.मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर गंभीर आरोप

पुणे दिनांक १नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला आहे.काल सरकारच्या वतीने जालन्यात सर्वत्रच इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की."इंटरनेट बंद केल्यानंतर साहजिकच लोंकाचा रोष वाढणारच.आता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचला आहे.मी आरक्षण मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. सरकार मधील एका उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्यांचा डाव असू शकतो" असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.तातडीने विषेश अधिवेशन बोलवा.व मराठा समाजाला कुणबीचे सरसकट आरक्षण द्या.व कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश करा.व निर्णय लवकर घ्या.असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की " माझा मराठा समाज हा आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.व पूर्ण आरक्षण हवे.अर्धवट आरक्षण घेणार नाही.काल सरकारकडून इंटरनेट सेवा काहीजणांनी बंद करण्याचा प्रयत्न केला.पण नेटपेक्षा मराठा समाज आता हुशार झाले आहे.काल रात्रीच हजारो लोक इथे येऊन बसले आहेत.असे काम करून राज्यातील वातावरण दुषित करु नका.अर्धवट दिलेलं आरक्षण घेणार नाही." असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.यावर त्यांना प्रश्न विचारला की काही कारस्थान दिसतं का? आंदोलन चिघळवयाचा प्रर्यत्न आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की ते आता मला उठवू शकत नाही. त्यांचा डाव १०० टक्के दिसतोय.आंदोलन खुप मोठे झाले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही." उद्रेक आमच्याकडून होणार नाही.शांततेत आंदोलन सुरू राहील.आरक्षण दिल्याशिवाय आता हे आंदोलन थांबू शकत नाही." असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.