सुदैवाने आगीत जीवीतहानी झालेली नाही.अरुंद गल्ली मुळे आग विझवण्यास मोठा अडथळा : लातूर येथील कापड तीन मजली दुकानाला रात्री लागली भीषण आग 🔥, आगीत दुकानांतील माल जळून झाला खाक

पुणे दिनांक २९ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) लातूर शहरातील कापड गल्लीत असलेल्या एका तीन मजली दुकानाला अचानक पणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली दरम्यान या भागातील अरुंद गल्लीमुळे याठिकाणी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्याना आत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली.दरम्यान या दुकानांतील सर्व कापड जळून खाक झाले आहे.आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी बघ्याची याठिकाणी प्रचंड गर्दी झाल्यामुळे आगीवर नियंत्रणात आणण्यासाठी देखील अडचण झाली होती.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. लातूर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या कापड गल्लीतील पूनम मॅचिंग क्लाथ सेंटरला आज रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे 🔥 आग लागली सर्व प्रथम दुकानाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली व ती पसरत गेली.दुकानामधील कर्मचारी यांनी तातडीने बाहेर आले पण दुकानातील लाखों रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे.लातूर अग्निशमन दलाच्या जवान यांनी ही अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.