Arrested : विद्यूत पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

२६ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हे शाखा, युनिट-6, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पो.स्टे गु.र.नं.359/2022 भा दं.वि.कलम 457, 380 हा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार अजय काळे व इतर 4 साथीदारांनी केलेला असून तो सध्या त्याचे साथीदारासह पांढया रंगाच्या सफारी कारमध्ये जाधववस्ती वाघोली पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत श्री.रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांना कळविले
आदेशाप्रमाणे जाधववस्ती वाघोली परिसरात सापळा रचून 1) अजय मांगीलाल काळे वय 25 वर्षे रा. मु.पो.इनामगाव ता.शिरुर जि.पुणे. 2) रोहित रामदास वाजे वय 27 वर्षे रा. जुना मोशी आळंदी रोड, मोशी पुणे. 3) वचिष्ठ श्रीमंत मुंढे वय 21 वर्षे रा. केसनंद, पुणे मुळगाव वडवणी ता.वडवणी जि.बिड, 4) कुमार नामदेव शेलार वय 22 वर्षे रा. वाघोली पुणे. 5) सुरज भैरवनाथ चौगुले वय 23 वर्षे रा. ता.करमाळा जि.सोलापूर, 6) सुनिल कोळप्पा विटकर वय 34 वर्षे, रा. वाघोली पुणे. मुळगाव मार्डी ता. उत्तर सोलापूर यांना ताब्यात घेऊन वरिल सर्व आरोपीनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी अटक करुन भा.दं.वि.कलम 395, 411 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आरोपींचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांनी ग्रामीण भागामध्ये लोड शेडींगचा प्राब्लेम असताना त्याचा फायदा घेऊन त्यांनी लोणीकंद व लोणी काळभोर या ग्रामीण भागात रात्रीचे वेळेस शेतकयांचे विद्यूत पंपांना वीज पुरवठा करणारे विद्यूत ट्रान्सफार्मर (डी पी) चे चोया करुन डी पी मधील तांबे व ऑईल चोरी करुन सदरचा माल सुनिल कोळप्पा विटकर यास विकला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून स्टील व पितळेचे विटा, 584 किलो तांब्याचे तारा असा 2,47,850/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे 6 व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे 6 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-6, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास युनिट-6, करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 2, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, युनिट 6 चे पोलीस उप.नि. सुरेश जायभाय, पो.उप.नि. भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मÏच्छद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.