दहीहंडी उत्सवाला गालबोट : दहीहंडी उत्सवात गॅलरी कोसाळून झालेल्या दुर्घटनेत एक मुलगी ठार.तर दुसरी गंभीर...

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथील मानसिंग पूरा येथे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे.गावात दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसाळून झालेल्या दुर्घटनेत एक लहान मुलगी घटना स्थळीच ठार झाली आहे.तर दुसरी नऊ वर्षाची मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून सदरची दुर्घटना ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आज जन्माष्टमीची धामाधूम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असून आज जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी साठी एका घराच्या गॅलरीला दोरी बांधण्यात आली होती.यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक वर चढले व दोरीला लटकले.याचवेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसाळून ही दुर्घटना झाली आहे.यावेळी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी थांबलेल्या निदा रशीद खान पठाण ही नऊ वर्षांच्या मुलीच्या अंगावर गॅलरी कोसाळून तिचा घटना स्थळी मृत्यू झाला आहे तर यामध्ये अल्फिया शेख हाफीज (वय ८ वर्षे ) हिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारा साठी जालना येथील रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान जन्माष्टमीनिम्मित दहीहंडीच्या कार्यक्रमा दरम्यान ही दुर्घटना झाली त्यामुळे देऊळगाव राजा व व मानसिंगपूरा भागात सर्वत्र हळहळ नागरिक व ग्रामस्थ करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.