पाच एकरावर फ्लोअर मील हजारो मैद्याची पोती आगीत जळून खाक : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील फ्लोअर मारला शाॅक सर्किटमुळे भीषण आग लागून मशिन सह राॅ मटेरियल कोट्यवधी रुपयांचा माल जळून 🔥 खाक

पुणे दिनांक २६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तब्बल पाच एकरावर भव्य अशी असलेल्या अप्रर्णा फ्लोअर मीलला काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शाॅक सर्किटमुळे 🔥 आग लागली आहे.या आगीत मशनरी व मैदा व रव्याने भरलेली हजारो पोती जळून खाक झाली आहे.व अंदाजे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.व आग शाॅक सर्किटमुळे मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेबाबत पोलिस सूत्रांन कडून मिळालेली माहिती नुसार निलंगा शहरात निलंगा - लातूर रोडवर पाच एकरावर अर्पणा फ्लोअर मील आहे.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे फ्लोअर मीलला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती.ही मील मोठ्या प्रमाणावर असून यात दोन शिफ्ट मध्ये काम चालते आग लागली होती तेव्हा कामगार कामावर होते परंतू या आगीत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही.मीलला आग लागल्याचे कळताच कामगारांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला.मात्र अग्निशमन दलाचे जवान येऊ पर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले.आग आटोक्यात आणण्यासाठी बरंच वेळ लागला आहे.या आगीत हजारो मैदा व रव्याचे पोते व मशनरी जळून खाक झाली आहे.व अंदाजे मील मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.