Crime : पुण्यात कोंढव्यात NIA व IB यांची संयुक्त रित्या कारवाई मह्त्वाचे कागदपत्रे जप्त एकास घेतले ताब्यात

पुणे दिनांक ३.जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यात national investigations Agency. ( NIA ) व आय बी.ने.( intelligence Bureau. IB.) यांनी संयुक्त रित्या छापेमारी केली आहे .कोंढवा भागात हे छापे टाकण्यात आले आहे. व सदरच्या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीत छापेमारी करून जुबेर शेख ( वय ३९.) यास चौकशी साठी यास राष्ट्रीय तपास यंत्रणा व ( NIA ) ने संयुक्त रित्या छापेमारी करून ताब्यात घेतले. या छापेमारी मध्य त्याच्या कडून काही मह्त्वाचे कागदपत्रे पुढील तपासा करिता ताब्यात घेण्यात आली आहेत.
दरम्यान आज पहाटे ४.वाजण्याच्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वजीर कस्केड सोसायटी नुराणी कब्रस्तान जवळ चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ४२.A.wing. कोंढवा पुणे येथे सदरची कारवाई करण्यात आली. या छापेमारी मध्ये जुबेर शेख ( वय ३९.) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईच्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. या कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोगले. ( गुन्हे.) व गोपनीय अंमलदार तपास पथकाचे कर्मचारी व कोंढवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी या वेळी हजर होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.