Gutkha and tobacco : मोठया प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त

२८ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असलेला टेम्पो शास्त्रीनगर चौकाकडून पुणे नगर रोडने जाणार आहे. सदरची बातमी सपोनि रविंद्र आळेकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुणे नगर रोडवर सपोनि रविंद्र आळेकर, पोहवा एकनाथ जोशी, पोअं सोमनाथ भोरडे, भोसले हे सापळा रचून थांबलेले असताना एक संशयीत पांढ-या रंगाचा पीकअप टेम्पो सिध्दार्थनगर रामवाडी पोलीस चौकीचे समोर आला असता.सदरचा टेम्पो चालकासह ताब्यात घेवून टेम्पो चालकास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव सवाराम लाबुराम देवासी वय 39 रा कोंढवा पुणे मुळगाव गुडा केसरसिंह, देसुरी,पाली,राजस्थान असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विमल व राजनिवास नावाचे प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थानी भरलेली पोती मिळून आल्याने अधिक चौकशी करता सदरचा माल खडी मशीन चौक कोंढवा पुणे येथून टेम्पोमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेवून वाघोली पुणे येथे घेवून जात होता.
सदर टेम्पोमध्ये एकूण 13,87,880/- रु किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मुद्देमाल मिळून आला आहे.सदरबाबत येरवडा पो स्टे गु र नं 508/2022 भादवि कलम 328,273,272,188,34 अन्नसुरक्षा व मानके कायदा कलम 2006 चे कमल 26(2)(त्), 26(2)(त्ध्), 27(3)(ड्ड), सह वाचन 3(त्),(न्न्न्न्),(ध्) उल्लंघन केल्याने कलम 59 सह सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध) अधिनियम 7(2),20(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र आळेकर करत आहेत.
सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त,येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी सपोनि रविंद्र आळेकर,पोहवा एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.