Suicide news : प्रेमी युगूलांनी मध्यरात्री जंगलात केली आत्महत्या

सध्या गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून तरूणांमध्येही आत्महत्यांचेही प्रमाण वाढू लागले आहेत. पनवेल येथे अशीच एक धक्कादायक घटना आहे. या घटनेनं सध्या सगळीकडेच खळबळ उडाली आहे. दोन प्रेमी युगूलांनी मध्यरात्री आत्महत्या केली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबयिांना जबर धक्का बसला आहे. नक्की असं काय घडलं की तरूणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत जंगलात गेली आणि तिथून पुढे जे घडलं ते कोणाच्याही ध्यानी मनी नसेल.
पनवेल तालुक्यातील टावरवाडी गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने आणि 16 वर्षीय तरुणीने गवत मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राम शिमग्या निरगुडा (20) व पिंकी सिताराम निरगुडा (16) अशी या दोघांची नावे असून त्यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. राम आणि पिंकी या दोघांनी अशा पद्धतीने मृत्युला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेतील मृत राम आणि पिंकी हे दोघेही टावरवाडी गावात राहात होते. गत 18 जानेवारी रोजी रात्री पिंकी शेजाऱ्यांच्या घरात टिव्ही पहाण्यास जाते असे सांगुन घरातुन बाहेर पडली होती. त्यानंतर पिंकी आणि राम हे दोघेही टावरवाडी गावापासून सुमारे किमीच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जंगलात गेले होते. त्याठिकाणी दोघेही रात्रभर थांबल्यानंतर त्यांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गवत मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर पिंकीने रामच्या मोबाईलवरुन आपल्या आईला फोन करुन सदर प्रकाराची माहिती दिल्यानंतर दोघांच्या पालकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.
दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जंगलामध्ये ज्या ठिकाणी राम आणि पिंकी या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन केले, त्याठिकाणी पोलिसांना गवत मारण्याच्या विषारी द्रव्याची बाटली सापडली आहे. सदर बाटली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या दोघांनी प्रेमप्रकरणातुन टोकाचे पाऊल उचलुन आत्महत्या केल्याचे बोलेले जात आहे. पनवेल तालुका पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.