छत्रपती संभाजीराजे तातडीने आंतरवाली सराटीत साडेबारावाजे प्रर्यत पोहचणार : मोठी घडामोड छत्रपती संभाजीराजे तातडीने कोल्हापूर येथून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवाली सराटीत

पुणे दिनांक २५ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आंतरवाली सराटीत आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.व पुढील आंदोलनाची दिशा ठरवून आमरण उपोषणाला बसणार आहेत.शिंदे सरकारला ४० दिवसांचा दिलेला अल्टीमेटम काल संपला आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवीन एक अपडेट समोर आली असून कोल्हापूर येथून छत्रपती संभाजीराजे हे आंतरवाली सराटीत येण्या साठी तातडीने निघले आहेत.ते दुपारी साडेबारा वाजे पर्यंत पोहचतील असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहे.ते उपोषण कालावधीत औषधे व पाणी देखील त्याग करणारे आहेत.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा आधीच तातडीने छत्रपती संभाजीराजे हे कोल्हापूर येथून आंतरवाली सराटीत येण्यासाठी निघाले आहेत ते घटनास्थळी येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते. आता या दोघांच्यात काही म्हत्वाची चर्चा होते.हे पाहणे महत्त्वाचे आहे.व चर्चाकडे तमाम महाराष्ट्रांतील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.आता मराठा समाज हा आरक्षण साठी प्रचंड आक्रमक झाला आहे.व त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.