A man sexually assaulted a minor girl : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला सुनावली 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा

मदतीचे ढोंग करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि त्याचबरोबर १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव हरीदास बाळासाहेब टकले वयवर्षे २६ आहे.
हरीदास टकलेने मदतीचे ढोंग करत अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याने तिला कोल्हापूर आळंदी या भागात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटणेची पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब टकलेला अटक केली. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले . न्यायालयात साकार पक्ष्याच्या वतीने वकिल अॅड. सुचित्रा नरोटे यांनी बाजू मांडली. या खटल्यात सरकार पक्ष्याच्या वतीने १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या, त्यामध्ये पीडित मुलीचे वडील, भाऊ आणि लॉज मॅनेजरची या तीन व्यक्तींची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली .
हरीदास टकले हा विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीस मदतीचे ढोंग करून तिला जाळ्यात ओढले आणि त्यांनंतर तिच्यावर अत्याचार केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आणि दंडाचे १० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.