Crime : आज पहाटे पिंपरी चिंचवड येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग 🔥 चार जणांचा मृत्यू

पुणे दिनांक ३० ऑगस्ट (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड येथील चिखली भागतील एका हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली असून.भीषण 🔥 आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान सदरची आग 🔥 ही शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती मिळत आहे आज पहाटे पिंपरी चिंचवड येथील चिखली भागतील सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली होती या दुकानातच कुंटूंब राहत होते.सदरची आग इतकी भीषण होती की या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.आगीत मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.व यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे असे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या वतीने ही आग नियंत्रणात आणली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.