तीन चार चाकीचे आगीत मोठे नुकसान : आज पहाटे ठाण्यातील पाचपाखाडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग 🔥 पार्किंग मधील ११ दुचाकी जळून खाक

पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाणे शहरात आज पहाटे पाचपाखाडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंग मध्ये अचानक पणे लागलेल्या भीषण आगीत एकूण ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.तर यात ३ चार चाकीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या आगी बाबत माहिती मिळतात घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवान व बंब दाखल झाले असून ते आग आटोक्यात आणता आहे.
दरम्यान या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले असून आता ही आग आटोक्यात आणली असून.सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मात्र पार्किंग मधील ११ दुचाकीचा संपूर्ण कोळसा झाला आहे.तर या आगीत ३ चार चाकीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली या बाबत अद्याप प्रर्यत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.