Pune crime : अवैध सावकारकी करून महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाया सावकारी पती-पत्नीस केले जेरबंद

बदल्यात केवळ व्याजापोटी मे 2022 पर्यंत गैरअर्जदार यांना 9 लाख 45 हजार रूपये दिले असतानादेखील गैरअर्जदार हे अर्जदारास व त्यांच्या मैत्रिणीने घेंतलेल्या 5 लाख 50 हजार रूपयांच्या बदल्यात दोघींचे मिळून एकत्रितरित्या मुद्दल,दंड व व्याजापोटी आणखी 21 लाख 39 हजार रूपयांची मागणी करीत असून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून सिक्यूरीटी पोटी बळजबरीने कोरे चेक व स्टॅम्प पेपर घेतले असून सदरचे पैसे पंधरा दिवसा मध्ये परत केले नाही,तर राहते घराचा ताबा घेणेबाबत समजुतीचा करारनामा पाचशे रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदार यांचेकडून बळजबरीने लिहून घेतला आहे. त्याबाबत चौकशी करून चौकशीअंती दिनांक 02/11/2022 रोजी सिंहगड रोड पो स्टे गु.र.नं.463/2022,भा.दं.वि.कलम 386,387,452,504,506,34,महा.सावकारी अधिनियम कलम 31,39, 44,45 अन्वये इसम नामे जयराम निवृत्ती पोकळे,वय-43 वर्षे,रा. कुंभार चावडी समोर,क्राऊन बेकरी,धायरी गाव,ता.हवेली,जि.पुणे व त्याची पत्नी सौ. रेखा उर्फ हेमा जयराम पोकळे,वय-36 वर्षे, रा.सदर यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हयात सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउनि.विकास जाधव,खंडणी विरोधी पथक-1, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे),श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,(गुन्हे), श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहायक पोलीस आयुक्त-1,गुन्हे शाखा,श्री.गजानन टोंपे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक,अजय वाघमारेे, पो.उप.निरी.विकास जाधव, पोलीस अंमलदार, राजेंद्र लांडगे, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, प्रविण ढमाळ, प्रमोद सोणावणे, अमर पवार यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.