अपघातात तीन डबे रुळावरून घसरले आंध्र प्रदेशातील दुर्घटना : विशाखापट्टणमवरुन रायगडकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली; एका पॅसेंजरची दुसऱ्या पॅसेंजरला टक्कर सहा जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील अलमांडा -कंकटापल्ल जवळ आज रविवारी एक पॅसेंजर ट्रेनची दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणंचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत यात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे ही ट्रेन विशाखापट्टणम येथून रायगडाकडे जात असताना हा अपघात झाला असून तीन डबे रुळावरून घसरले आहेत.
दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार. अपघातानंतर रेल्वे प्रशासनांच्या व बचावकार्य सुरू आहे.मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या ट्रेन अपघाता नंतर या जिल्ह्यातील प्रशासनाला शक्य तितक्या रुग्णवाहिका व पाठविण्या बाबत आदेश दिले असून जखमींना तातडीने जवळील रुग्णांलयात दाखल करण्यासाठी आदेश दिले आहेत.दरम्यान बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.