मराठा आरक्षणांचा बळी : मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास बसलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू हिंगोलील घटना

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली येथे साखळी उपोषणाला बसलेल्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश नामदेवराव मगर असे आहे.सदरची घटना आज सायंकाळी घडली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील शिंदी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावातील लोकांनी साखळी उपोषण सुरू केले होते.प्रकाश हे देखील उपोषण करत होते.दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.प्रकाश हे मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा सर्व आंदोलना मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा आज त्यांच्या मृत्यूनंतर अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दुःख झाले आहे.आज एक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणांऱ्या एक योध्दा आपल्यातून निघून गेला. अशा भावना मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान प्रकाश मगर यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.