पूल कोसाळतांनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : गुजरातमध्ये नवीन पूल कोसळून एक रिक्षा चालक ठार.ढिगाऱ्यांखाली अनेकजण अडकल्याची भीती

पुणे दिनांक २४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पूलाचे नवीन काम चालू असताना अचानकपणे ओव्हर ब्रीजचे एकूण पाच गडर्स कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.यात जीव वाचवण्यासाठी अंतःकरणाने पळणाऱ्या एका रिक्षावाल्याला दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या गर्डर खाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे ओव्हर ब्रीजचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू होते.रेल्वे ट्र्याक वरुन रोड क्रॉस करण्यासाठी ओव्हर ब्रीजचे कामसुरु होते.सदरचे काम हे आरटीओ सर्कल जवळ काम सुरू होते.या पुलाचे गर्डर पडतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.सदरचे ओव्हर ब्रीजचे काम राष्ट्रीय महामार्ग ५८ वर सुरू होते.याप्रकरणी गुणवत्ता नियंत्रण अधिक्षक अभियंता डिझाईन सर्कल अधिक्षक अभियंता व GERI अधिक्षक अभियंता यांना तातडीने घटनास्थळी बोलविण्यात आले आहे.दरम्यान या घटनेची संपूर्ण पाहणी केल्यानंतर सत्य बाहेर येईल.दरम्यान हा ओव्हर ब्रीज गुजरात राज्यातील सर्वात मोठा पूल होता.घटनास्थळी जिल्हा प्रशासन पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.सदरचा पूल कोसाळतांना या भागात मोठ्या प्रमाणावर आवाज आल्याने अनेक जण घाबरून जीवाच्या आकांताने घटनास्थळावरून पळत होते पूलाचे खालून रेल्वे ट्रॅक असून सुदैवाने यावेळी कोणतीही रेल्वे पास झाली नाही तर सर्वात मोठी दूर्घटना झाली असती असे या भागातील नागरिक म्हणत होते.या पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.