MMS Scandal : कानपूरमधील वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचे अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी स्टाफ मेंबरला अटक

चंदीगड MMS स्कँडलप्रमाणेच आता कानपूरमधून एक प्रकरण समोर आले आहे. रावतपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या तुळशीनगर येथील मुलींच्या वसतिगृहातील मुलींनी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुलींनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर ऋषी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आहेत.
मुलींच्या म्हणण्यानुसार, ऋषी नावाचा हा कर्मचारी वसतिगृहात रोज येत असे आणि तो मोबाईल फोन दरवाजाच्या तुटलेल्या खालच्या भागात ठेवून व्हिडिओ शूट करत होता. तुळशीनगर परिसरात हे वसतिगृह असून ते एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीचे आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सुमारे ६० विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. सर्वोदय नगर येथे राहणारा आरोपी ऋषी हा गेल्या सात वर्षांपासून या वसतिगृहात काम करतो.
आरोपी कानपूरच्या काकादेव परिसरात असलेल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये ८ वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत होता. व्हिडिओ बनवताना एका मुलीने कथितपणे त्या व्यक्तीला पकडले तेव्हा हा प्रकार घडला. रिपोर्टनुसार, तोपर्यंत आरोपीने त्याच्या फोनमधून अनेक व्हिडिओ डिलीट केले होते. यानंतर मुलींनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
हे मुलींचे वसतिगृह एका पोलिस अधिकार्याचे आहे, जो यूपीच्या एका जिल्ह्यात अतिरिक्त एसपी म्हणून तैनात आहे. या वसतिगृहात वैद्यकीय चाचणीची तयारी करणाऱ्या विविध जिल्ह्यातील मुली राहत होत्या. कल्याणपूरचे एसीपी दिनेश शुक्ला यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मुलींकडून तक्रार आली आहे. त्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची चौकशी करण्यात येत असून त्याच्या फोनचीही चौकशी करण्यात येणार आहे.
याप्रकरणी 10-12 मुलींनी तक्रार केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. या घटनेची तक्रार केली असता वसतिगृह व्यवस्थापक ते घेण्यास नकार देत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. ते म्हणाले की, सफाई कामगार गेली अनेक वर्षे काम करतो, तो हे काम कसे करणार. यानंतर मुलींना पोलिसांची मदत घ्यावी लागली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.