Opium powder : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे एकुण 06 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस अंमलदार हे परिमंडळ 4 मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक 19/11/2022 रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार 1683 चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राजस्थान येथील एक इसम सिध्दार्थ नगर, धानोरी येथे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे मिळालेल्या माहिती नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक -2, कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी सिध्दार्थ नगर,लेन नं.1, धानोरी, पुणे येथे सापळा लावला असता दि.19/11/2022 रोजी एक इसम सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेउुन उभा असलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारता करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित वय 38 वर्षे रा.हिस्सा नं.1 सी/1/39 सिध्दार्थ नगर, धानोरी पुणे मुळ गाव मु-दुरासनी, तहसिल सोजत, जि.पाली राज्य राजस्थान असे सांगीतले त्याची झडती घेता त्याचे ताब्यात कि.रु 81,490/- रु किमतीचा एकुन 06 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी जप्त केला.
त्याचे विरुध्द पोलीस हवालदार 1683 चेतन गायकवाड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाणे, येथे गु.र.नं. 289/2022 ,एनडीपिएस अॅक्ट कलम 8(क),15(ब). अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक सातपुते नेमणुक विश्रांतवाडी पो. स्टे,पुणे हे करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त, गुन्हे 2, श्री.नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमंलदार संतोष देशपांडे,चेतन गायकवाड,प्रशांत बोमादंडी,रोकडे,मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, आझीम शेख, जगदाळे, योगेश मांढरे, खेवलकर, बास्टेवाड यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.