महाड मधील ब्लू जेट केमिकल कंपनीत प्लांटला लागली होती 🔥 आग : महाड केमिकल फॅक्टरीमध्ये लागलेल्या आगीत एकूण ९ जणांच्या मृत्यू तर ५ जण जखमी

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) रायगड जिल्ह्यातील महड एमआयडीसी मधील ब्लू जेट केमिकल कंपनीला काल लागलेल्या आगीत एकूण ९ कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य ५ कामगार हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जवळपास १० तासांच्या नंतर ही आग आटोक्यात आणली आहे.यात काल ७ कामगार यांचे मृतदेह आढळले होते तर उर्वरित २ कामगारांचे मृतदेह आज सापडले आहेत.स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर 🔥 आग लागली होती.कालच एनडीआरएफची टीम दाखल झाली होती.
दरम्यान काल ब्लू जेट केमिकल कंपनीत एका प्लांटचा मोठा स्फोट होऊन आग 🔥 लागली होती.या ठिकाणी एकूण ११ कामगार अडकले होते.५ जणांनवर रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कालच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली होती बचावकार्य करुन काल ७ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.व आज पून्हा २ कामगार यांचे मृतदेह आढळून आले आहेत. आता या दुर्घटनेत एकूण ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जवळपास १० तासा नंतर ही आग आटोक्यात आणली आहे.स्फोट झाल्यानंतर जवळपास तब्बल १२ तासानंतर देखील कामगारांच्या नातेवाईकांना कंपनी प्रशासनाच्या वतीने कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.यावेळी नातेवाईकांना बरोबर पोलिस व कंपनी प्रशासन यांच्यात बाचाबाची झाली होती.यावेळी नातेवाईक यांनी प्रचंड गोंधळ घातला होता.मृत्यूमुखी झालेल्या कामगारांना कंपनीच्या वतीने ३० लाख रुपये.मुख्यमंत्री सहाय्याता निधीतून ५ लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख रुपये असे एकूण ४५ लाख रुपये मदत या कामगारांना मिळवून देऊ अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी यावेळी दिली आहे.दरम्यान राज्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या कंपनीला भेट देऊन कामगार यांचा नातेवाईकांशी चर्चा केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.