सात जणांच्या सामूहिक आत्महत्या नंतर सुरत हादरले : गुजरातमधील सुरत येथे एकाच कुटुंबातील एकूण सात जणांनी आत्महत्या केली आहे

पुणे दिनांक २८ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरात मधील सुरत शहरातील एका सोसायटीतील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या सात जणांनी मिळून सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यात तीन लहान मुलांचा समावेश आहे.या घटनेमुळे सुरत शहरात अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.मृतांमध्ये मनिष सोलंकी.त्यांची पत्नी शोभा सोलंकी.व दिशा दिव्या.व कुशल नावाच्या तीन मुलांचा यात समावेश आहे.यात सहा जणांनी विष खावून तर मनीषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिस तपासामध्ये समोर आलं आहे.मनिषने आधी सर्वांना विष दिलं त्यानंतर त्यांने स्वतः पंख्जयाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.मनीष सोलंकी यांचा सूरत शहरात होम फर्निचरचा व्यवसाय होता.त्यांच्या या उद्योगात एकूण ३५ कर्मचारी हे काम करत होते.आज त्यांच्या एका कर्मचाऱ्याने त्यांना फोन लावला पण मनीष यांनी फोन घेतला नाही त्यामुळे एक कर्मचारी मनीष यांच्या घरी गेला त्या कर्मचाऱ्यांने बेल वाजवली पण दरवाजा उघडत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला त्यानंतर आतील दुष्यपाहून सर्वांच्या पाया खालची वाळूच सरकली व सर्वांना मोठा धक्का बसला आत्महत्या केलेल्या सर्वांचे मृतदेह घरात पडलेले होते. पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.या आत्महत्या बाबत कारण समजू शकले नाही.याबाबत पुढील तपास करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.