Crime : भिमाशंकर येथे ट्रेकिंग करतांनाच पुणे येथील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुदैवी मृत्यू

पुणे दिनांक १६ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे येथील काहीजणांनाचा एक ग्रुप ट्रेकिंग करण्या करीता पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला गेला होता. त्यातील रमेश भगवान पाटील हे ट्रेकिंग करतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. ते ५७ वर्षांचे होते.
दरम्यान या बाबत सूत्रांन द्वारे मिळालेली माहिती अशी कि पुणे येथील आनंद सुभाष शाळगावकर .रमेश पाटील. यांच्यासह दिनेश बोडके.मंजीत चव्हाण. प्रविण पवार. संदीप लोहकर .सुनील गुरव.हे मिळून पुणे ते भिमाशंकर असा २५ किलोमीटर पायी ट्रेकिंग आयोजित केले होते.रविवारी सकाळी ७ वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक मधून त्या सर्वांनी पायी चालण्यास सुरूवात केली. पायी चालत जातांना गुप्त भिमाशंकर येथे २ वाजण्याच्या सुमारास रमेश पाटील हे चक्कर येउन कोसळले त्यांच्या मित्रांनी त्यांना हालविण्याचा प्रयत्न केला. पण पण त्यांनी काहींच प्रतिसाद दिला नाही. त्यांना कृत्रिम श्वसनश्र्वास देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांना तातडीने मंदीर परीसरात आणले .
व या बाबत घोडेगाव पोलीस यांना या बाबत माहिती देण्यात आली. पोलीसांनी पाटील यांना तातडीने तळेघर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले व पण पाटील उपचारा करिता काहीही प्रतिसाद देत नव्हते म्हणून त्यांना पुढे रूग्णवाहिकातून घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले .तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषित केले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.