Crime : नागपूरात दोनमजली इमारात नाल्यात कोसळली. जीवीत हानी झाली नाही साहित्य गेले वाहून

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नागपूरात दोन मजली इमारत नाल्यात कोसळल्याची दुर्घटना घडलीआहे. या धक्कादायक दुर्घटना मध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही .मात्र घरातील साहित्य यात वाहून गेले आहेत.
नागपूर मध्ये एक दोन मजली इमारत नाल्यात कोसळल्याची धक्कादायक दुर्घटना आज घडली असून. या दुर्दैवी दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र घरातील सर्व साहित्य यामध्ये वाहून गेले आहे. टेका नई बस्ती येथील चिराग अली चौकात मध्यरात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या चांभार नाल्याच्या भिंतीला खेटून असलेली दोन मजली इमारत अचानक पणे नाल्यात कोसळली या नंतर या भागात एकच खळबळ उडाली. इमारत पडत असल्याचा आवाज येतात इमारती मधील सर्व बाहेर पळाले त्यामुळे ते थोडक्यात वाचले आहेत. ही इमारत शकील अन्सारी यांची असून इमारत कोसळत असतांना सहाजण घरातच होते पण इमारत कोसळण्याचा आवाज आल्या नंतर सर्व जण बाहेर पळाले त्यामुळे ते थोडक्यात वाचले आहेत. इमारत कोसळल्या नंतर स्थानिक नागरिकांनी अन्सारी यांच्या घराकडे पोहचले. या वस्ती जवळूनच मोठा नाला वाहतो आहे.आणी या नाल्याला लागूनच ही वस्ती आहे .सध्या पाऊस झाल्या मुळे हा नाला ओंसडून वाहत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.