Crime : पसरणी घाटात ब्रेक फेल झाल्याने एस टी बसला अपघात अपघातात एका महिलेचा मृत्यू

पुणे दिनांक ३० (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यावरून महाबळेश्वरला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरा जवळ बसचे अचानक ब्रेक फेल होऊन भीषण असा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या बस मध्ये एकूण २५ प्रवासी हे प्रवास करत होते.
दरम्यान या अपघाता बाबत सूत्रांनच्या द्वारे मिळालेल्यामाहितीनुसार पसरणी घाटात अवजड वळणावर बस असतांना अचानक पणे बसचे फेल झाल्याने बस रिव्हस मध्ये मागच्या बाजुला आली याच दरम्यान पाठीमागूण एक मोटरसायकल येत होती ही बस मोटरसायकल स्वरांच्या अंगावर गेली त्या मुळे मोटरसायकल वरील एका महिलासह अन्य दोघे जण बसच्या चाका खाली आले यात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बसच्या चालकांने मागे येणारी बस कंटरोल करण्यांचा प्रयत्न केला पण पंरतु याच बस खाली मोटरसायकल आल्याने झालेल्या अपघातात प्रिती बोधे या महिलेचा मृत्यू झाला. व नंतर बस घाटाती ल .कठाड्याला अडकून थांबली .या बस मध्ये एकूण २५ प्रवासी होते. ही बस कठाड्याला अडकली नसती तर घाटात जाऊन मोठी दुर्घटना घडली असती पंरतु प्रवाशांच्या सुदैवाने ही दुर्घटना टळली आहे. सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.