शुक्रवारी मध्यरात्रीची घटना : टिपू सुलतानचा स्टेटस ठेवणाऱ्या युवकास कोल्हापूरातील कसबा बावड्यात जमावाने बदडले

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टिम) कोल्हापूर येथून एक नवीन अपडेट समोर आली असून कोल्हापूरा मधील गगनबावडा येथे एकाने टिपू सुलतानचे स्टेटस कसबा बावडा येथील युवकाला जाब विचारत शुक्रवारी रात्री जमावाने चांगलीच मारहाण केली.मारहाणी नंतर सदरचा युवक घराकडे पळत जात असताना संतप्त झालेल्या जमावाने त्याचा पाठलाग करुन त्याच्या घरावर देखील दगडफेक केली आहे.
दरम्यान याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले यावेळी संतप्त झालेल्या जमावाने सदरच्या युवकाला त्वरित अटक करा.व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करत रोडवरच ठिय्या आंदोलन करण्याच्या प्रयत्न केला यावेळी मोठा तणाव निर्माण झाला.तणाव वाढत आहे असे दिसताच पोलिसांनी सदरच्या युवकाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.