Crimes : बोपोडीत भरदिवसा युवकावर कोयत्याने वार

पुणे.दिनांक १.जुलै. ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे शहरात कोयता गॅगचे थैमान कमी होण्यचे काही नाव घेत नाही. आज पुन्हा पुण्यात बोपोडीत छाजेड पेट्रोल पंपावर मोटारसायकलला. धक्का लागल्या बद्दल जाब विचारणाऱ्या युवकांवर टोळक्याने त्या युवकांवर कोयत्याने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न करीत. व पेट्रोल पंपावरच कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे
दरम्यान पुणे पोलीस आयुक्त यांनी कठोर निर्णय घेतले तरी कोयता गॅगचा धुमाकूळ कमी होत नाही .संपूर्ण पुणे शहरावर कोयता गॅग च्या दहशतीच्या सावाटा खाली आहे. असे म्हणणे आता चुकीचे ठरणार आहे.आज सर्व सामान्य नागरिकाला कामा साठी बाहेर पडणे अवघड झाले आहे.केवळ मोटरसायकल धक्का का मारला म्हणून जाब विचारला म्हणून कोयत्याने हल्ला होत असेल तर नक्कीच शिक्षणाच्या माहेर घरात आता कायदा सुव्यवस्था आता पुणे शहरात राहीली नाही. या घटने बाबत पोलीस चौकी मध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या नंतर एकास अटक केली आहे पण अन्य आरोपी फरार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.