Crime : मणिपूरमध्ये १७ अल्पवयीन शाळेतील मुलींचे अपहरण पुन्हा भडकली हिंसा

पुणे दिनांक २९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मणिपूरच्या इंफाळ येथील बिष्णुपूर जिल्ह्यातील कामोंग येथील अज्ञात समाजकंटकांनी १७ शाळेतील विद्यार्थ्यांनीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण केलेल्या या शाळेकारी मुलीं १२ ते १४ वर्षीय असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान अपहरण कर्त्यांच्या तावडीतून ३ मुलींनी आपली धावत्या कार मधून सुटका करून घेतली आहे.या मुलींच्या अपहरण करण्यासाठी अज्ञात अपहरण कर्त्यांनी २ इको व्हॅनचा वापर केला आहे.सदरची घटना ही इंफाळ पासून १५ किलोमीटर अंतरावरील कामोंग मधील हाओखंबन हायस्कूल येथे घडली आहे.
दरम्यान या अपहरण करण्यात आलेल्या शाळेकारी मुलींच्या सुटका करण्यासाठी पोलिस व सुरक्षा रक्षक यांच्या वतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मुलींच्या अपहरण प्रकरणी अपहरण कर्त्यांनचा खंडणी मागण्याचा हेतू देखील असू शकतो.कारण या भागात दोन समूहाचा अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर चालू आहे.त्यामुळे याभागात जाळपोळ अशा घटना सुरूच आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.