पोलिसांच्या गोळीबारात छर्रे घुसलेल्या दोघांना मुंबईला हलवले : निजामकालीन वंशावळाची अट रद्द करुन मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या,आज सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक

पुणे दिनांक ११ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपोषण व आंदोलन कर्ते यांनी आता निजामकालीन वंशावळाची अट रद्द करुन मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी दिलेला चार दिवसांचा आल्टीमेटम संपला असून उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सलाईन काढले व जलपान सोडलं आहे.यासाठी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुंबईत सह्याद्रीवर सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख प्रतिनिंधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे.सदरची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली आहे.
दरम्यान आद्याप मराठा आरक्षणांवर कोणताही तोडगा निघाला नाही.त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.उपोषणामुळे जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला आहे.तसेच त्यांच्या किडणीवर देखील परीिणाम होत आहे.असे डाॅक्टर यांचे म्हणणे आहे.व त्यातच त्यांनी आता सलाईन लावून घेण्यास व जलपान करण्यास नकार दिला आहे.त्यामुळे आता सरकारची डोकेदुखी वाढली आहे.पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अंगात छर्रे घुसलेल्या दोघांना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबई मधील लिलावती हाॅस्पिटल मध्ये हलवण्यात आले आहे.हिंगोली ते कनेरगाव मार्गावर चिंचाळा पाटीजवळ अज्ञातांनी एसटी बस पेटवली.
दरम्यान आता मराठा आरक्षणांचा मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन व शहर व गाव बंद तसेच आंदोलनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विविध मागण्यांसंदर्भात सरकार गंभीर नसल्यामुळे आज जालना येथे ठिय्या.तर १६ सप्टेंबर रोजी मराठवाडाभर चक्का जाम आंदोलन होणार आहे. मराठा आरक्षण साठी गेल्या आठ दिवसांपासून कायगाव येथे स्व.काकासाहेब शिंदे स्मारकाजवळ शिवबा संघटनेचे संपर्कप्रमुख देवीदास पांडे पाटील हे उपोषणाला बसले आहेत.त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनंतर गंगापूरचे आमदार प्रशांत बंड पांडे यांना भेटण्यासाठी आले होते.पण संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटू दिले नाही.जोप्रर्यत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.एकाही लोकप्रतिनिधींने आम्हाला भेटू नये.तुमच्या सांत्वनाची आम्हाला गरज नाही.तुम्ही परत जा .असे म्हणत कार्यकर्ते यांनी आमदार प्रशांत बंब यांना खडेबोल सुनावलं व त्यांना आल्या पावली परत पाठवले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.