Arrested : कुविख्यात निलेश वाडकर टोळीच्या साथीदारांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात अटक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन,पुणे गुन्हा रजि नंबर 758/2022,भादंविकलम 307,364,324, 506,34 या गुन्हयातील आरोपी पुनम वाडकर व त्यांचे साथीदारांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक,अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक,धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे हे शोध घेत असताना त्यांना आरोपी पुनम वाडकर ही जनता वसाहत येथे असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी जनता वसाहत येथे जावुन आरोपी पुनम निलेश वाडकर,रा पुणे हिस ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हयातील पाहीजे आरोपी ओकंार चंद्रकांत बेलुसे व राम राजेंद्र अवचट यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना सदरचे आरोपी हे पदमावाती कॉर्नर,पुणे येथे थांबले असल्याची माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पदमावती कॉर्नर येथे जावुन सापळा रचुन तेथे आरोपी 1.ओकंार चंद्रकांत बेलुसे,वय-23 वर्षे,रा.जयभवानी नगर,जनता वसाहत,शनि मंदीर,महीला मंडळाचे मागे,पर्वता पायथा,पुणे 2.राम राजेंद्र अवचट,वय-21 वर्षे,रा.शाहु वसाहत,लक्ष्मीनगर,गजानन महाराज चौक,पर्वती पायथा,पुणे हे मिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हया मध्ये दिनांक 15/11/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक,अंकुश कर्चे हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग,पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक,(गुन्हे),विजय पुराणिक, सहा.पोलीस निरीक्षक,अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक,धिरज गुप्ता, पोलीस उप-निरीक्षक,अंकुश कर्चे, पोलीस अंमलदार, शैलेश साठे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले व प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.