Crime : घरफोडीतील गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशा नुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादी यांना आज पुनः प्रदान

पुणे दिनांक १३( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) अलंकार पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगार यांच्या कडून जप्त करण्यात आलेला ७९लाख ८४ हजार ४८० रूपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशा नुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादी यांना आज पुनः प्रदान करण्यात आला आला आहे.
दरम्यान पुणे शहरातील अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी झाली होती सदरच्या घरफोडी प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात घरफोडी बाबत गुन्हा रजिस्टर नंबर ११६| २०२२ मध्ये घरातील रक्कम व डायमंड व सोने व चांदीचे दागिने ९८ लाख १५.हजार रूपायांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घरफोडी करून चोरून नेला आहे. या घरफोडी प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटना स्थळावर पाहणी करून घटना स्थळाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपास पथकातील पोलीस अंमलदार. धीरज पवार. सागर केकाण.व नितीन राऊत. यांना एक पुरूष व महिला संशयित रित्या घटना स्थळाच्या बाजूला फिरत आहे.
असे आढळून आले .त्या आधारे आणखीन तपास केला असता. तपास पथकातील अंमलदार यांनी संशयित आरोपी राजू दुर्वेधन काळमेघ ( वय ४५.राहणार. एन. बी.पर्ल. सोसायटी क्रांती नगर वडगाव बुद्रुक पुणे)याला अटक करून सदरच्या चोरी बाबत त्यांचा कडे चौकशी केली असता त्यांने आपण आपल्या अन्य महिला आरोपी मिळून सदरची घरफोडी केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्याची कबुली दिल्या नंतर पोलीसांनी राजू यास दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी अटक केली. व महिला संशयित आरोपीचा शोध पोलीस तपास पथकातील पोलीस करीत असतांनाच सदरची महिला हि वाकड येथून मुद्देमाल घेऊन पळून जाण्याचा तयारीत असतांना वाकड येथून सोनिया श्रीराम पाटील ( वय ३२.राहणार. एन.बी.पर्ल सोसायटी वडगाव बुद्रुक पुणे) अटक करण्यात आली व तिच्या कडून पंचा समक्ष पंचनामा करून सदरचा मुद्देमाल जप्त केला व सदरचा मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आला.सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिल्या नंतर आज पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर येथे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादी यांना ७९लाख ८४.हजार ४८०. रूपायांचा मुद्देमाल देण्यात आला आहे. या वेळी पोलीस उपयुक्त परिमंडळ-३चे सुहेल शर्मा अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता पाटील हे उपस्थित होते. या वेळी पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता पाटील यांचा पोलीस आयुक्त पुणे रितेश कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.