Arrested : रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या जाधव यांचे खुनातील आरोपी 08 तासात जेरबंद

कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.1137/2022,भादवि कलम 302,34,भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),135 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ गुन्हे शाखा युनिट-5 कडील अधिकारी व अंमलदार यांनी टिम नेमुन तपासाबाबत सुचना दिल्यानंतर, तपासा दरम्यान युनिट-5 कडील पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहीती मिळाली की,कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार तोहीद शेख आणि रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत दोन बालकांनी मोन्या जाधव यांचा खुन केला असुन ते परराज्यात पळुन जाण्याचे तयारीत असुन ते डेक्कन येथील झेड ब्राीजखाली थांबलेले आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
पोलीस निरीक्षक,हेमंत पाटील हे त्यांचे स्टाफसह तात्काळ डेक्कन झेड ब्राीज येथे पोहचुन आरोपींचा शोध घेतला असता,तेथे रेकॉर्डवरील आरोपी तोहिद समीर शेख,वय-22 वर्षे,रा. कोंढवा-खुर्द,पुणे व दोन विधीसंषर्घीत बालक हे मिळुन आले. त्यांचेकडे सखोल चौकशी करता,“मोन्या जाधव हा गुन्हेगार असुन,त्याचे व आमच्या मध्ये पुर्वीपासुन वाद होते. तो आम्हांला एकट्या दुकट्याला गाठुन नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करीत होता,म्हणुन आम्ही त्याचेवर हल्ला करुन कोयत्याने वार करुन त्यास जीवे ठार मारुन पळुन आलो होतो” अशी कबुली दिली.
यातील मयत मोन्या जाधव आणि आरोपी यांचेत पुर्ववैमनस्य होते आरोपीतांनी मोन्या जाधव याचेवर यापुर्वी देखील खुनी हल्ला केलेला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन 08 तासाचे आत आरोपींताना युनिट-5 कडुन जेरबंद केले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,श्री.अमोल झेंडे, मा.सहायक पोलीस आयुक्त,श्री.नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक,हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक,अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, दाउत सैय्यद, विलास खंदारे आणि दया शेगर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.