Accused arrested : मारहाण करुन लुटणा-या आरोपींना अटक

०८ ऑक्टोबर २०२२ रोजी फिर्यादी हे शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असताना गाडगीळ पुतळा चौक,कसबा पेठ, पुणे येथे आले असता त्यांच्या समोरुन आलेल्या तीन इसमांनी त्यांना आडवुन त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेतला. तेव्हा फिर्यादी हे प्रतिकार करत असताना सदर तीन इसमांनी त्यांना हाताने मारहाण करुन ते पळुन जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पवळे चौक, कसबा पेठ, पुणे येथे पकडुन ठेवुन पोलीसांना कळविले.
फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन आरोपी 1)केशव गणेश कठायर, वय 22 वर्षे रा.फुटपाथवर,शनिवारवाडा,पुणे मुळ रा.झुराईल,जि.दोटी, देश नेपाळ,2) अॅलेक्स वाननिवमी वय 23 वर्षे रा.फुटपाथवर,शनिवारवाडा,पुणे मुळ रा.खेगनम थाना माहुर जि.दिमआसव राज्य नागालँड 3)कृष्णा तुलबहादुर झरगा वय 34 वर्षे रा.फुटपाथवर,शनिवारवाडा,पुणे मुळ रा.गुरखा,घुगी जि.पालपा देश नेपाळ यांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांची अंगझडती घेतली असता नमुद आरोपीकडुन फिर्यादीचा 5000/- रुपये किंमतीचा रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी नामे साहेब मिलन मल्लीकरा-हडपसर, पुणे यांनी सदर तीन इसमांविरुध्द फिर्याद दिल्याने फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा.रजि.नं 181/2022 भा.दं.वि कलम 394,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद आरोपीना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री.राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 पुणे डॉ. प्रियंका नारनवरे,. मा.सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर,यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.शब्बीर सय्यद, सहा.पोलीस निरीक्षक,संतोष शिंदे,पोलीस उपनिरीक्षक,निलेश मोकाशी,पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी,मेहबुब मोकाशी, गणेश दळवी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर,समीर माळवदकर, गणेश आटोळे,सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके,अजय शिंदे, महावीर वल्टे, किशोर शिदे यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.