Accused arrested : खुन,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी,दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला फरारी असलेल्या आरोपीस केले जेरबंद

भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हददीमध्ये युनिट-2 कडील अधिकारी व अंमलदार असे दिं.19/10/2022 रोजी गस्त करीत असताना,पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील रेकार्डवरील मोका गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी,आदित्य दिलीप खुडे हा गुजरवाडी फाटा येथे थांबलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने युनिट-2 प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीचे ठिकाणीवरील वर्णना प्रमाणे इसम उभा असलेला दिसला,त्याचेकडे जात असताना तो पळुन जावु लागल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफिने पकडुन,त्यास वि·ाासांत घेवुन अधिक माहिती घेतली असता त्याचे नांव आदित्य दिलीप खुडे,वय-25,रा.गुजरवाडी फाटा, जाधवनगर,कात्रज,पुणे असे सांगीतले.
त्याचेबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे खात्री करता तो गुन्हा.रजि.क्र.105/2022,भा.द.वि.कलम 307,323,504,506,34, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(2) व 3(2)3(4) या गुन्हयात सहभाग असलेचे निष्पन्न झाले आहे. नमुद दाखल गुन्हयात आरोपी आदित्य दिलीप खुडे हा पाहिजे आरोपी असल्याने,त्यास पुढील कायदेशीर कारवाईकामी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अप्पर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पो.आयुक्त,गुन्हे,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,श्री.क्रांतीकुमार पाटील,गुन्हे शाखा,युनिट-2,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक,श्रीमती.वैशाली भोसले, पोउपनिरी.राजेंद्र पाटोळे,पोलीस अंमलदार,नामदेव रेणुसे, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, नागनाथ राख व महिला पोलीस अंमलदार, साधना ताम्हाणे या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.