सरकारने फाशी नाही दिली पण देवाने न्याय केला ; मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया : कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे दिनांक १० सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्या मधील आरोपी जितेंद्र शिंदे यांने आज सकाळी येरवडा कारागृहात स्वतःच्या टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याप्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणा करीता बसले आहेत.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की.सरकाने फाशी दिली.पण देवाने न्याय केला असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपींने आत्महत्या केल्याच्या घटनेवर बोलताना जरांगे पाटील म्हटले आहे की.आज देवाने न्याय केला.कारण ज्यावेळी ही घटना घडली होती.त्यावेळी सर्वच जाती - धर्माचा माणूस एकटावला होता.या आरोपींचं कोणीच समर्थन केले नव्हते व त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती.त्यामुळे आज सर्वांची इच्छा पूर्ण झाली झाली आहे.आज देवाने न्याय केला असून,पापाने दम धरला नाही.आपण केलेले कृत्य हे खूप वाईट असल्याचा त्याला पश्र्चाताप झाला असेल .पण शेवटी देवानेंच न्याय केला.या सरकारने आमच्या ताईला न्याय नाही दिला , पण देवाने न्याय दिला आहे. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान कोपर्डी हे प्रकरण १३ जुलै२०१६ ला कोपर्डी मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.नोव्हेंबर २०१७ रोजी यातील आरोपी जितेंद्र शिंदे.नितीन भैलुमे.संतोश मवाळ दोषी ठरविण्यात आले होते.यातील जितेंद्र शिंदे याला फाशीची शिक्षा तर उर्वरित दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दरम्यान फाशीच्या शिक्षे विरोधात जितेंद्र शिंदे यांने मुंबई हायकोर्टात अपील केले होते.त्याच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरूच होती . सप्टेंबर २०२३ मध्ये शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता कोपर्डी ग्रामस्थांनी उपोषण केले होते.१० सप्टेंबर आज जितेंद्र शिंदे यांने येरवडा कारागृहात टाॅवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.