Pune Crime : सिंहगड रोड पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्हयातील आरोपी 10 तासाच्या आत निष्पन्न व गजाआड

३० सप्टेंबर २०२२ रोजी एका व्यक्तीाला विश्व अपार्ट.न-हे,पुणे येथे कारमधून आणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खुन केला असलेबाबत फिर्याद दिल्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. 428/2022 भादंवि कलम 302,143,144,145,148,149 प्रमाणे अनोळखी 5 ते 7 व्यक्तीां विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा,युनिट-3,पुणे शहर हे तपास करीत असताना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, सुनिल नलावडे (मयत व्यक्ती) याच्या ओळखीची महिला सौ.वनिता समीप कुर्डेकर, वय-42 वर्षे,न-हे,पुणे हीस व तीचा पती समीप कुर्डेकर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करता सुनिल नलावडे (मयत व्यक्ती) याने मंत्रालय,मेट्रो विभाग येथे नोकरीस लावतो असे अमिष दाखवुन व अनेक महिलांना लोन मंजूर करून देतो असे अमिष दाखवून फसवणुक केलेला सुनिल नलावडे (मयत व्यक्ती) याने फसवणुक केलेले नागरीक त्याचा गेल्या दिड वर्षापासून शोध घेत होते.
३० सप्टेंबर २०२२ रोजी सुनिल नलावडे (मयत व्यक्ती) हा महिला वनिता समीप कुर्डेकर यांच्या घरी आले बाबतची माहिती फसवणुक झालेला व्यक्ती महेश धुमाळ यास प्राप्त झाल्याने,त्याने त्याचे ओळखीचे असलेला शिवराज सिंह यास व इतर फसवणुक झालेल्या व्यÏक्तना माहिती देवून सदर महिलेच्या घरी येणेबाबत कळविल्याने विश्व अपार्ट.न-हे,पुणे येथे पाठवून सदर महिलेच्या घरात आरोपी 1)महेश शंकरराव धुमाळ,वय-32 वर्षे,रा.मु.पो.पिंपळे खालसा,हिवरे कुभार,पदमावती वस्ती,ता.शिरुर,जि-पुणे 2)शिवराज किशोर प्रसाद सिंह,वय-32 वर्षे,रा.मोहितेवाडी,पोस्टा-वडगाव,ता-मावळ,जि-पुणे 3)शिवाजी रंगाप्पा तुमाले,वय-56 वर्षे,रा.फ्लॅट नं.204,दत्तदिप सोसा.गंगानगर,फुरसुंगी,ता.हवली,जि.पुणे 4)अक्षय पोपट आढाव,वय- 22 वर्षे,रा.सिरापुर,ता. पारनेर, जि.अहमदनगर तसेच वरील चार आरोपी व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी घरात घुसून सुनिल नलावडे (मयत व्यक्ती) यास हात-पाय बांधुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून व ओढत बिÏल्डगचे खाली पार्किग मध्ये आणून,पुन्हा त्यास बेदम मारहाण करून तो बेशुध्द पडल्याचे पाहून वरील सर्व व्यक्ती पळून गेले असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने युनिट-3,कडील तीन वेगवेगळी पथके तयार करून तळेगाव दाभाडे, फुरसुंगी,सिरापुर,ता.पारनेर,जि.अहमदनगर येथे पाठवून,नमुद निष्पन्न 04 आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडील मोबाईल व गुन्हयात वापर केलेली स्कोडा कार असा एकुण 5,09,000/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची वैदयकिय तपासणी करून मुददेमालासह स्ंिाहगड पोलीस ठाणे,पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले असून,दाखल गुन्हयाचा पुढिल तपास सिंहगड पोलीस ठाणे,पुणे शहर हे करीत आहेत.
वरीलप्रमाणे दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा,युनिट-3 कडून संलग्न तपास करून अज्ञात आरोपी विरूध्द दाखल असलेल्या आरोपींना दाखल गुन्हयात निष्पन्न करून व त्यांचा शोध घेवून त्यांचेकडे तपास करून 10 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी, मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त,श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,पुणे शहर,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीमती.अनिता मोरे, पोलीस उप-निरीक्षक,अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.